प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख व राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू जे निर्णय घेतील तो निर्णय योग्य असणार आहे, कारण प्रहार जनशक्ती पक्ष हा बच्चुभाऊ कडू यांचा स्वतंत्र्य पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या पक्षासोबत जायचं हा त्यांचा निर्णय आहे. बच्चु भाऊ हे दबावातून नव्हे तर आत्मविश्वासातून काम करतात. त्यामुळे बच्चु भाऊ कोणत्याही पक्षा सोबत गेले तरी सर्वसामान्य जनतेला कधीच विसरणार नसून प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख बच्चुभाऊ कडू जे निर्णय घेतील तो योग्यच असल्याचे मत प्रहार चे तालुकाध्यक्ष वैभव जावळे यांनी सांगितले.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी अनेकदा सत्ता येताना व जाताना पाहिले आहेत. त्यामुळे सत्तेच्या मोहापेक्षा विकासाचा कामाचा ध्यास त्यांना अधिक आहे. प्रहार हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास सक्षम आहे जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हिताला प्राधान्य देत बच्चुभाऊ निर्णय घेतात. विविध राजकीय पक्ष कार्यरत असताना त्यांचे अस्तित्व मात्र घाबरट प्रवृत्तीचे दिसुन येते. त्यामुळे बच्चुभाऊ कडू जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी योग्यच असणार आहे, असे प्रहारचे मोहोळ तालुकाध्यक्ष वैभव जवळे यांनी सांगितले.