रणजित चवरे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

मोहोळ/धुरंधर न्यूज

पेनूर येथील रणजित चवरे यांची सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल पेनूर येथे भव्य नागरी सत्कार पार पडला.

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून परिचित असलेले पेनूर येथील रणजित चवरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या हस्ते देण्यात आले होते. दरम्यान या निवडीबद्दल पेनूर येथे भव्य नागरी सत्कार पार पडला.

यावेळी भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, लोकसेवक संजय क्षीरसागर, सरचिटणीस रमेश माने, सरचिटणीस सतिश पाटील, हर्षवर्धन पाटील, दादासाहेब इंगोले, उपसरपंच विजय कोकाटे, तेजस बोबडे, सचिन गुंड, गुरूराज तागडे, मारुती गवळी, दत्तात्रय चवरे, ज्ञानेश्वर माने, दादा सलगर, अरुण चव्हाण, संजू शेख, सचिन चवरे, सुहास चवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजू सलगर, कुंडलीक टेकळे ,शितल चवरे, विकी सलगर ,बाळासाहेब चवरे , बालाजी चवरे, निलेश चवरे, सोमनाथ चवरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *