या दिग्गजांचे झाले अर्ज बाद…
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या १५ जागांसाठी लागलेल्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७५ अर्जासाठी दि.१ जुलै रोजी झालेल्या अर्ज छाननी मध्ये ४७ अर्ज विविध कारणांसाठी फेटाळण्यात आले आहेत. तर १२८ अर्ज वैध झाले आहेत. दरम्यान दि.१८ जुलै पर्यंत अर्ज काढण्याची मुदत असल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती अर्ज राहतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूकीची प्रक्रिया असून ३० जून पर्यंत दाखल करण्यात आलेल्या १७५ अर्जाची छाननी दि.१ जुलै रोजी करण्यात आली होती. त्याचे प्रसिद्धीकरण दि.४ जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी केले. या छाननी मध्ये ४७ अर्ज विविध कारणांसाठी फेटाळण्यात आले आहेत. तर १२८ अर्ज वैध झाले आहेत. या नामंजूर करण्यात आलेल्या अर्जामध्ये गटनिहाय पुळूज-६, टाकळी-१०, सुस्ते-१४, अंकोली-८, कोन्हेरी-५, अनुसूचित जाती-१, इतर मा. गट-२, भटक्या जमाती-१ असे एकूण ४७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पोटनियमातील तरतुदीनुसार निवडणुकीपूर्वीच्या लगतच्या पाच गाळप हंगामापैकी किमान तीन गाळप हंगामामध्ये ऊस घालण्याचे बंधन पाळले पाहिजे असा नियम आहे. मात्र मात्र सन २०१९-२० मध्ये सदर कारखाना बंद असल्याने या तरतुदीची पूर्तता होणार नाही, त्यामुळे सदरच्या वर्षातील हंगाम विचारात घेता येणार नाही, असे असे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी स्पष्ट करीत निवडणूक लगतच्या पाच हंगामापूर्वीचा एक हंगाम विचारात घेण्यात आला असल्याचे त्यांनी लेखी पत्र काढले. दरम्यान दि.१८ जुलै पर्यंत अर्ज काढण्याची मुदत असल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती अर्ज राहतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
चौकट-
एकूण दाखल अर्ज- १७५
छाननी मध्ये नामंजूर नामनिर्देशन पत्र- ४७
मंजूर अर्ज -१२८
मंजूर अर्जापैकी डबल अर्ज-१४
एकूण मंजूर अर्ज-११४
चौकट-
छाननी मध्ये नामंजूर अर्ज
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी- कृष्णदेव वाघमोडे,
कोन्हेरी गट-
दत्तात्रय कदम, सुमन घागरे, समाधान शेळके, हर्षद दळवे, ज्योतिराम घागरे,
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट- प्रकाश सोनटक्के,
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट-
पांडुरंग वसेकर, शामल गावडे,
अंकोली गट- सुरेश शिवपूजे, राजेश पवार, हरिभाऊ काकडे, विठ्ठल कोळी, बाबासाहेब जाधव, तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर कदम, दिपक मोरे,
सुस्ते गट- तानाजी कांबळे, शिवाजी क्षीरसागर, यशवंत चव्हाण, तानाजी पाटील, अंकुश लामकाने, प्रदीप निर्मळ, पार्वती बोबडे, तानाजी पवार (२ अर्ज), लक्ष्मीबाई साळुंखे, समाधान चवरे, दिलीप घाडगे (२ अर्ज), बापूराव चव्हाण,
टाकळी सिकंदर गट-
प्रकाश सोनटक्के, बापूसाहेब चव्हाण, दत्तात्रय सावंत, रमेश माने, अशोक चव्हाण, हरिदास गावडे, वनिता वसेकर, हिम्मतराव पाटील, लक्ष्मण शिंदे, सुनील सातपुते,
पुळुज गट-
लिंगदेव देशमुख, छगन पवार, चंद्रकांत शिंदे, प्रभाकर गावडे, उमाकांत पाटील, नानासाहेब मदने
वरील ४७ जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
चौकट-
छानणीमध्ये मंजूर अर्ज खालीलप्रमाणे-
पुळूज गट-
धनंजय महाडिक, विश्वराज महाडिक, बिबीशन वाघ, देवानंद गुंड, कल्याणराव पाटील,
टाकळी सिकंदर गट- बाबुराव शिंदे, संभाजी कोकाटे, बबन बेदरे, राजाराम माने, शिवाजी भोसले, राजेंद्र चव्हाण, विक्रम डोंगरे, संग्राम चव्हाण, ईश्वर चवरे, सर्जेराव चवरे, सुनील चवरे, पंकज चव्हाण, मनोज सातपुते, दिनकर भैय्या देशमुख,
सुस्ते गट-
तुषार चव्हाण, पंकज नायगुडे, रामहरी रणदिवे, संतोष सावंत, केशरबाई देठे, महादेव माने, तात्यासाहेब नागटिळक, शरद लोकरे, समाधान जगताप, वर्षा चव्हाण, तुकाराम वाघमोडे, तानाजी घाडगे, शिवाजी शिनगारे, विठ्ठल रणदिवे,
अंकोली गट- सतीश जगताप, गणपत पुदे, चंद्रशेन जाधव, सज्जनराव पवार, भारत पवार, रघुनाथ सुरवसे, साहेबराव वराडे, प्रताप पवार,
कोन्हेरी गट- राजेंद्र टेकळे, राजकुमार पाटील, भीमराव मुळे, साहेबराव काकडे, धोंडीबा उन्हाळे, राजाराम पाटील, कुमार गोडसे,
सहकारी संस्था प्रतिनिधी- धनंजय महाडिक, विश्वराज महाडिक, राजेंद्र चव्हाण, मंगल महाडिक, भारत सुतकर,
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी-
बाळासाहेब गवळी, तानाजी सावंत, तानाजी सुतकर, भारत सुतकर, विनायक सरवदे, सुहास आवारे, नंदकुमार लोंढे, तानाजी कांबळे, गौतम खरात, कुंडलिक घोडके,
महिला राखीव प्रतिनिधी- राजश्री पुदे, सिंधू जाधव, प्रतिक्षा शिंदे, केशरबाई देठे, छाया डोंगरे, सुवासिनी चव्हाण, भावना शिवशेट्टी, उज्वला वसेकर, मनीषा वसेकर, जयश्री पाटील, पद्मा चव्हाण, रजनी पवार, अर्चना घाडगे, भिवराबाई गावडे, लक्ष्मीबाई साळुंखे, सुनिता माने, राजश्री निर्मळ, चंद्रकला चव्हाण, रेशमा चव्हाण, सिंधू चव्हाण, शैला पाटील,
इतर मागासवर्ग प्रतिनिधी-
समाधान शेळके, अनिल गवळी, शंकर माळी, नागनाथ मोहिते, बब्रुवान माळी, विक्रम गवळी, राजाभाऊ भंडारे, प्रकाश गवळी, नवनाथ माळी, चंद्रकांत वसेकर, हिम्मत डोके, सुधीर बसाटे, हरिभाऊ काकडे, सिद्धेश्वर अंबुरे,
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग प्रतिनिधी- सिद्राम माने, दिगंबर खांडेकर, दिलीप काळे, राजू गावडे, तुकाराम वाघमोडे, ज्ञानेश्वर पाटील, मोहन खरात, बिळाणसिद्ध पुजारी, मोहन गावडे, सिद्धेश्वर अनुसे, नानासाहेब मदने, भिवराबाई गावडे, महेंद्र देवकते, नवनाथ अनुसे
वरील १२८ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.