तिरंगी सामना रंगणार
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ८४ जणांनी ९४ अर्ज दाखल केले असून आतापर्यंत एकूण १७५ जणांनी भिमाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान उद्या दि.१ जुलै रोजी अर्जाची छाननी होणार असून वैध अर्जांची यादी दि.४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने चेअरमन खा. धनंजय महाडिक यांनी आवाहन केलेले बिनविरोध ची शक्यता धूसर झाली आहे.
भीमा परिवार, भीमा बचाव संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना यांच्या पॅनल मध्ये तिरंगी लढत लागण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत दरम्यान दि. २७ व २८ जून रोजी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन खा. धनंजय महाडिक, विश्वराज महाडिक, विद्यमान व्हाईस चेअरमन सतीश जगताप सोहाळे, समाधान शेळके कोन्हेरी, तुषार चव्हाण मगरवाडी, गणपत पुदे, राजश्री पुदे शेजबाभूळगाव, चंद्रसेन जाधव, सिंधू जाधव कुरुल, राजेंद्र टेकळे पापरी, बाळासाहेब गवळी घोडेश्वर, अनिल गवळी पेनूर, सिद्राम मदने पुळूजवाडी यांनी एकूण १६ अर्ज दाखल केले होते.
दि. २९ रोजी ऊस उत्पादक मतदार संघ पुळुज गटातून बिभिषण बाबा वाघ, चंद्रकांत दादा शिंदे, लिंगदेव रावसाहेब देशमुख, प्रभाकर सिद्राम गावडे, टाकळी सिकंदर गटातून बापूसाहेब नारायण चव्हाण, दत्तात्रय तात्या सावंत, बाबुराव नाशिकेत शिंदे, संभाजी नामदेव कोकाटे, बबन दत्तू बेदरे, राजाराम दगडू माने, शिवाजी संदिपान भोसले, विक्रम प्रल्हाद डोंगरे, हिम्मतराव प्रतापराव पाटील, राजेंद्र केराप्पा चव्हाण, सुस्ते गटातून पंकज मच्छिंद्र नायकुडे, रामहरी अनंत रणदिवे, संतोष चंद्रकांत सावंत, केशरबाई मल्लिकार्जुन देठे, महादेवराव अगतराव माने, तात्यासाहेब ज्ञानोबा नागटिळक, शरद विलास लोकरे, यशवंत मोहन चव्हाण, तानाजी बाबुराव पाटील, समाधान ज्ञानोबा जगताप, वर्षा तुषार चव्हाण, अंकुश सुबराव लामकाने, अंकोली गटातून बाबासाहेब सौदागर जाधव, तुकाराम दत्तात्रय पाटील, सज्जनराव साहेबराव पवार, सतीश नरसिंह जगताप, कोन्हेरी गटातून भारत गोविंद पवार, दत्तात्रय विठोबा कदम, राजकुमार भास्कर पाटील, हर्षद शहाजी दळवे, ज्योतीराम औदुंबर घागरे, भीमराव संभाजी मुळे, रावसाहेब प्रल्हाद काकडे, धोंडीबा गणू उन्हाळे, राजाराम आत्मारामु पाटील, अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी तानाजी दाजी सावंत, तानाजी सिताराम सुतकर, भारत सुदाम सुतकर, विनायक रायप्पा सरवदे, सुहास कुमार आवारे, महिला राखीव प्रतिनिधी मधून प्रतिभा बाबुराव शिंदे, केशरबाई मल्लिकार्जुन देठे, छाया दिलीप डोंगरे, सुहासिनी शिवाजी चव्हाण, भावना तानाजी शिवशेट्टी, उज्वला भाऊराव वसेकर, जयश्री हिंमत पाटील, विमल अंकुश लामकाने तसेच इतर मागासवर्ग प्रतिनिधी गटातून शंकर गंगाधर माळी, नागनाथ भीमराव मोहिते, बब्रुवान सावळा माळी, विक्रम अनिल गवळी, राजकुमार कुंडलिक भंडारे, पांडुरंग कुंडलिक वसेकर,प्रभाकर बळीराम गवळी तर भटक्या विमुक्त जाती /जमाती विशेष मागास प्रवर्गातून दिगंबर आगतराव खांडेकर, दिलीप नामदेव काळे व राजू विठ्ठल गावडे अशा एकूण ६२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
दरम्यान अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दि.३० जून रोजी भटक्या वि. जाती /जमाती वि. मागास प्रवर्ग – भिवराबाई गावडे, महेंद्र देवकते, नवनाथ अनुसे, कृष्णदेव वाघमोडे, तुकाराम वाघमोडे, ज्ञानेश्वर पाटील, सिद्राम मदने, मोहन खरात , बिळानसिद्ध पुजारी, नानासाहेब मदने , मोहन गावडे, सिद्धेश्वर अनुसे ,इ. मा. वर्ग प्रतिनिधी – नवनाथ माळी, चंद्रकांत वसेकर, गिरीश गवळी, हिम्मत डोके, सुधीर बसाटे, शामल गावडे, सिद्धेश्वर अंबारे, महिला राखीव प्रतिनिधी – जयश्री पाटील, शैला पाटील, पद्मा चव्हाण, रजनी पवार, अर्चना घाडगे, भिवराबाई गावडे, लक्ष्मीबाई साळुंखे, सुनिता माने, राजश्री निर्मळ, चंद्रकला चव्हाण , रेश्मा चव्हाण, सिंधू चव्हाण , अनु. जा/ज. प्रतिनिधी – नंदकुमार लोंढे, भारत सुतकर, तानाजी कांबळे, गौतम खरात, प्रकाश सोनटक्के, कुंडलिक घोडके, उत्पादक सह. संस्था / बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी – राजेंद्र चव्हाण, मंगल महाडिक, विश्वराज महाडिक, भारत सुतकर, कोन्हेरी गट – कुमार गोडसे, अंकोली गट – सुरेश शिवपुजे, ज्ञानेश्वर कदम, रघुनाथ सुरवसे, साहेबराव वराडे, दीपक मोरे, प्रताप पवार, राजेश पवार, हरिभाऊ काकडे , विठ्ठल कोळी, सुस्ते गट – पार्वती बोबडे, शिवाजी शिनगारे, तानाजी कांबळे, विठ्ठल रणदिवे, शिवाजी क्षीरसागर, तुकाराम वाघमोडे, समाधान चवरे, तानाजी पवार , दिलीप घाडगे ,बापूराव चव्हाण, लक्ष्मीबाई साळुंखे, तानाजी घाडगे, प्रदीप निर्मळ, टाकळी सिकंदर गट – दिनकर देशमुख , प्रकाश सोनटक्के, हरिदास गावडे,वनिता वसेकर, संग्राम चव्हाण, ईश्वर चवरे, सर्जेराव चवरे, सुनील चव्हाण , रमेश माने, पंकज चव्हाण, अशोक चव्हाण, लक्ष्मण शिंदे, सुनील सातपुते, मनोज सातपुते, पुळुज गट – देवानंद गुंड, उमाकांत पाटील, कल्याणराव पाटील , छगन पवार, धनंजय महाडिक, बिभीषण वाघ आधी ८४ जणांनी ९४ अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले.