मुंबई येथे पक्षश्रेष्ठींसोबत झाली बैठक
गेल्या दोन महिन्यापासून मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय असलेला माजी आमदार राजन पाटील यांच्या पक्ष बदलाच्या विषयावर अखेर पडदा पडला असून मुंबई येथे आज दि.१० ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माजी आमदार राजन पाटील व जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वस्वी अधिकार देण्यात आले असून पक्षांअंतर्गत असलेली लुडबुड बंद करण्याचे ठरले असल्याचेही सांगण्यात आले.
मुबंई येथे विरोधी पक्ष नेते ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आ राजन पाटील, आमदार यशवंत माने यांच्यात बैठक पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत होत असलेली लुडबुड यासह असलेल्या अनेक तक्रारी पक्षश्रेष्ठींसमोर मांडण्यात आल्या. त्यांच्या नावावर तालुक्यात सुरू असलेली कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून दिली.
यानुसार अखेर सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यात मागील काही महिन्यापासून सुरू राजकीय वादंगावार मुबंई येथे अखेर पडदा पडला असून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. यामध्ये सोलापूर जिल्हाची सर्वस्वी जबाबदारी तसेच आगामी निवडणुकांमध्ये घेण्याची सर्व निर्णय हे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या कडेच तर मोहोळ विधानसभेची जबाबदारी माजी आ. राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या कडेच राहील, असे बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी ग्वाही जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी आमदार राजनजी पाटील, आमदार यशवंत माने यांना दिली.