मोहोळ/धुरंधर न्युज
सौंदणे (ता. मोहोळ) येथील शंकरराव वाघमारे यांची माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघडी च्या प्रदेश अध्यक्षपदी नुकतिच निवड जाहिर झाली आहे. माळी महासंघा चे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली माळी महासंघाचे अरुण तिखे यानी ही निवड नुकतीच घोषित केली आहे.
मोहोळ तालुक्यातील सौंदने येथील रहिवाशी असणारे वाघमारे हे गेल्या ३५ वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात काम करित आहेत.त्यानी यापूर्वी नशामुक्ती, दारुबंदी आदी विषयावर जनजागरण करित कामं केले आहे. तसेच सुमारे २० वर्ष सामुदायीक विवाह चे आयोजन केले आहे. श्री. संत सावता माळी प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले आहेत. यामुळे त्याना यापूर्वी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केलेमुळे अनेकदा पुरस्कार देखील मिळाले आहेत. सौंदने ग्रामपंचायत चे सरपंच तसेच पंचायत समिती सदस्य या पदावर देखील त्यानी काम केले आहे, त्यानी रक्तदान सारखे उपक्रम देखील यापूर्वी केले आहेत. तचेच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हतील संघटना वाढीत त्यांचे मोलाचे योगदान आहे . भाजप चा गावचा सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष असा त्याचा प्रवास राहिलेला आहे. सध्या ते महाराष्ट्र भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ही त्यांचे कड़े जबाबदारी आहे. या निवडी बद्दल समाजातील सर्व स्थरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.