माळी समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक मेळावा

माळी समाज बांधवांसाठी भव्य राज्यस्तरीय वधू वर सूचक व पालक मेळाव्याचे आयोजन माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रविवार, दि.१ मे रोजी सकाळी १० वाजता सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर ता. माळशिरस माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यावेळी माळी शुगर फॅक्टरी, डायरेक्टर राजेंद्र गिरमे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व माळी सेवा संघाचे आधारस्तंभ रूपालीताई चाकणकर, माळी सेवा संघ संस्थापक दत्तात्रय माळी, संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज शुभ आशीर्वाद ह.भ.प. रमेश महाराज वसेकर, उपाध्यक्ष बालाजी माळी, ज्ञानदेव जाधव, अध्यक्ष नितीन राजगुरू, महिला उपाध्यक्ष उर्मिला भुजबळ, युवक कार्याध्यक्ष महेश गोरे, प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब ननवरे, बिजनेस आघाडी बालाजी वाहील, सोमनाथ माळी, वधू वर सुचक उपाध्यक्ष अनंत कळसकर, पश्चिम महाराष्ट्र रुपेश नेहरूकर, सोलापूर जिल्हा संघटक पोपट गायकवाड, कार्याध्यक्ष बापू गवळी, सचिव गणेश म्हेत्रे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप देवकर माळी, अध्यक्ष अनिकेत आदलिंगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अंबादास वाघमारे, मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे आदी उपस्थित राहणार आहेत.

तरी पालकांनी आणि मोठ्या संख्येने रविवार दि.१ मे रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन माळी समाज वधु वर सुचक व पालक परिचय मेळाव्याचे आयोजक वधुवर सुचक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भारत मोहिते, उपाध्यक्ष सोमनाथ माळी व सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र एकतपुरे यांनी आवाहन केले आहे. ऑनलाईन मर्यादित नाव नोंदणी असून आजच नोंदणी करून सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 99 60 94 95 65/ 98 23 80 64 29 या नंबर वर नाव नोंदणीसाठी करून संपर्क करावा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *