मोहोळच्या मुलींचे शासकीय वसतीगृहाचे येथील थकित वीज बिल बालाजी अमाईन्स व लक्ष्मी हायड्रोलीक ने भरले

युवा जागृती मंच ने केला होता पाठपुरावा


मोहोळ/धुरंधर न्युज

लाईट बिलाचा घोळ आणि शासकीय कागदपत्रांचा खेळ यामध्ये अडकलेले मोहोळ येथील शासकीय मुलींचे वसतिगृह विद्यार्थिनींसाठी कधी उपलब्ध होणार असा संतप्त सवाल विद्यार्थिनींच्या पालकांमधून उपस्थित केला जात होता .तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत पावणेदोन वर्षांपासून धुळखात पडून होती. दरम्यान
महसुल प्रशासनाकडून चिंचालीकाटी एमआयडीसी येथील बालाजी अमाईन्स लि., लक्ष्मी हायड्रोलीक प्रा. लिमीटेड या कंपन्याना आवाहन करुन सी. एस. आर. फंडातुन वीज बील भरणा रक्कम भरली असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव यांनी दिली.
दरम्यान या विषयावर युवा जागृती विचार मंचच्या वतीने एड. आकाश कापुरे यांनी आवाज उठवला होता.

सन 2020 ते सन 2022 या कालावधीमध्ये जगभर कोविड-19 ची साथ तीव्र स्वरुपात व्यापलेली होती. सदर कोविड- 19 साथीची तीव्रता मोठया प्रमाणामध्ये असलेने सर्व रुग्णांना रुग्णसेवा पुरविणेकामी मोहोळ तालुका प्रशासन आरोग्य प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झालेले होते. सदर कालावधीमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये कोविड-19 चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून आलेले होते.

सदरचे रुग्णांना उपचार घेणेकामी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मोहोळ शहरातील मुलींचे शासकीय वसतीगृहाच्या नुतन इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलेले होते. सदर कोविड सेंटरमध्ये बाधीत रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणाव्दारे उपचार करण्यात येऊन अनेक कोविड रुग्णाना जीवदान देण्यात तालुका प्रशासनाला यश प्राप्त झालेले होते. सदर कालावधीत विद्युत पुरवठयाबाबतचे विज बिल रिडींग घेता आलेले नव्हते. तथापी सदर कोविड -19 साथ ओसरल्यानंतर सदर मुलींचे शासकीय वसतीगृह इमारतीमध्ये वापरण्यात आलेले बील एक लाख तीन हजार रूपये इतकी रक्कम थकीत राहीलेली होती. सदर थकीत बीलामुळे महावितरण कं. कडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे सन 2022 ते 2023 या कालावधीत विज बील भरणा करण्यात न आलेने वीज पुरवठा करण्यात आलेला नव्हता त्यामुळे सदर इमारत मुलींचे वसतीगृहाकरीता ताबा देण्यात अडचणी निर्माण झालेल्या होत्या.

त्याकरीता महसुल प्रशासनाकडून चिंचालीकाटी एमआयडीसी येथील बालाजी अमाईन्स लि., लक्ष्मी हायड्रोलीक प्रा. लिमीटेड या कंपन्याना आवाहन करुन सी. एस. आर. फंडातुन वीज बील भरणाकरीता रक्कम मागणी करण्यात आलेली होती. यासाठी प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव, प्रकाश दळवे मंडळ अधिकारी सावळेश्वर यांचे विनंती मान देवून बालाजी आमईन्स लि. चिंचोलीकाटी व लक्ष्मी हायड्रोलिक प्रा. लि. चिंचोलीकाटी यांनी प्रत्येकी रु.25000/- प्रमाणे रु. 50000/- भरणा करण्यात आलेली आहे. दोन वर्षापासून प्रलंबित असलेला थकीत वीज बीलाचा प्रश्न महसुल प्रशासनाचे माध्यमातुन सी. एस. आर. फंडातून रक्कम रु.50000/- भरणा करण्यात आलेली असून उर्वरीत रक्कम रु. 53370/- सात दिवसात भरणा करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणी उशिरा का होईना दखल घेतल्याबद्दल युवा जागृती मंचच्या वतीने आभार मानण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *