मोहोळ विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांचा राजू खरे यांना पाठिंबा

छ. राजर्षी शाहू महाराज बहु. संस्थेच्या वतीने जंगी सत्कार

मोहोळ/धुरंधर न्युज

मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विजयासाठी मतदार मोहोळ आणि उत्तर सोलापूर भागातील अनेक युवक आतापासूनच तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून याच मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी तिर्हे परिसरात जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहु संस्थेच्या वतीनेही भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना उद्योजक राजू खरे म्हणले की, आपण मागील निवडणुकीपासून मोहोळ मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली होती. ऐनवेळी पक्षाकडून आपल्याला थांबविले गेले. परंतु यावेळी मात्र आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. या निवडणुकीत अनेक तुल्यबळ उमेदवार रिंगणात असणार आहेत. परंतु आपण करीत असलेल्या कामाच्या जोरावर, तसेच युवकाकडून  आतापासूनच मिळत असलेली साथ, विविध जाती धर्मातील लोकाकडून मिळत असलेला आशीर्वाद आणि मोहोळ मतदार संघातील शिवसेनेला मिळत असलेला मोठा पाठिंबा यामुळे आपण आगामी विधानसभा सहजपणे विजयी होणार असल्याचे सांगितले.

    यावेळी शिवसेना मोहोळ विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रकाशदादा पारवे, शिवसेना उत्तर सोलापूर तालुका प्रमुख सुधीर गोरे, शिवसेना जिल्हा सचिव जावेद पटेल, शिवसेना उत्तर सोलापूर उप तालुका प्रमुख उमाकांत करंडे, शिवसेना मोहोळ तालुका उप प्रमुख अमर सोनवले, मानव परिवर्तन बहुउद्देशिय मागासवर्गीय सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष विक्रम तीर्थे (कोरवली), समाजसेवक दादासाहेब भोसले, चिंचोली काठीचे सरपंच राजेश पाटील, प्रताप अलदर, संदीप शेंडगे, राम जाधव, सौरभ शिंदे, अमोल बोराडे, नटराज पाटोळे, पंकज मसले, वैभव गायकवाड, राहुल घोरपडे, उमेश चंदनशिवे, अंबादास जाधव, दिगंबर अड्डक, मशाक बिराजदार,सुधीर दळवी, विजय पाटोळे, प्रशांत नाईकवाडी, चरण लम्बूवाले, लखन भिसे, कृष्णा बोराडे, नितिश माने, वसंत व्हणमारे, कृष्णा सुर्यवंशी, मोहसीन फुलारी, इलियास जमखंडी, नवनाथ गावडे, सोनुदादा शिंदे  यांच्यासह छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहु. संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *