पंढरपूर/धुरंधर न्युज
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, प्राथमिक फेरीत राज्यात 13 ठिकाणी आयोजित आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यातुन राज्यभरातील 46 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.दि. 3 सप्टेंबर रोजी ही अंतिम फेरी शिवसेना भवन दादर येथे पार पडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकांच्या पारितोषिकावर सोलापुर जिल्ह्य़ाच्या रणजित बागल यांनी मोहोर उमटवली.
या स्पर्धेत दुसरा क्रमांक अकोल्याचे अभिषेक करंजकर तर तृतीय क्रमांक मुंबई शहरातील ऋतुजा घुगे हिने मिळवला. या स्पर्धेसाठी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, साम टिव्हीच्या न्युज ब्युरो रश्मी पुराणिक, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, विधानपरिषद आमदार विलास पोतनीस, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, उपनेते अमोल किर्तीकर आदि. तज्ञ परिक्षकांकडुन परिक्षण करण्यात आले.
या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी सडेतोड भाषणे केली त्यामुळेच चुरस निर्माण झाली परंतु वास्तविकता व शेतकरी समस्यांबद्दल परखड मत व्यक्त करत रणजित बागल या स्पर्धेत अव्वल ठरले.
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना सचिव अनिल देसाई,मा.केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार व मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत, आ.सचिन अहिर, सुरज चव्हाण, विशाखा राऊत, मिना कांबळी, संजना घाडी, नितीन नांदगावकर, राजकुमार बाफना, मनोज जामसुतकर, महेश सावंत, प्रमोद शिंदे, महेश पेडणेकर, संतोष शिंदे आदि. उपस्थित होते.