सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, निरंजन टकले राहणार उपस्थित
मोहोळ/धुरंधर न्युज
मोहोळ येथे मंगळवारी दि.१९ मार्च रोजी महाविकास आघाडीची संकल्प सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले संबोधित करणार असल्याची माहिती काँग्रेसचे मोहोळ शहराध्यक्ष किशोर पवार व तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी दिली.
मोहोळ शहर आणि तालुका काँग्रेस समितीच्या वतीने मोहोळ शहरात महाविकास आघाडीच्या संकल्प सभेचे आयोजन मंगळवारी दि.१९ मार्च रोजी सकाळी १० वाजता घाटूळे मंगल कार्यालय येथे करण्यात आले असून या सभेसाठी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासह इतर घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या सभेसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
या महाविकास आघाडीच्या संकल्प सभे प्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले संबोधित करणार असून विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी विकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.