युवासेना तालुकाप्रमुख पदी विजय गायकवाड यांची निवड 

मोहोळ तालुका युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  तालुका प्रमुखपदी विजय गायकवाड यांची निवड झाली असून निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.

मोहोळ शहरामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत असणारे विजय गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली. यासंबंधी निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील युवकांचे मूलभूत प्रश्न सोडवून पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत यावेळी नूतन तालुकाप्रमुख विजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

या निवडीबद्दल जिल्हा समन्वयक दिपक गायकवाड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सीमाताई पाटील, संपर्क प्रमूख अनिल कोकीळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, अक्षय ढोबळे, तालुका प्रमूख अशोक भोसले, दादासाहेब पवार, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, युवानेते शिवरत्न गायकवाड, युवती सेना जिल्हाप्रमुख पुजाताई खंदारे, माजी युवासेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड आदींनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *