राष्ट्रपती निवडीबद्दल भाजप युवा मोर्चा च्या वतीने सामाजिक उपक्रम

आदिवासीं महिला द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ कोणतेही होर्डिग्ज न लावता सामाजिक कर्तव्य म्हणून भाजपा युवा मोर्चा कडून मोहोळ येथे भारतमाता आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना फळे व मास्क वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या व भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुढाकाराने सेवा समर्पण सप्ताहाचा भाग म्हणून भारत माता आदिवासी पारधी आश्रम शाळा मोहोळ येथे देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ व राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याबद्दल फळे वाटप व मास्क वाटप कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सागर वाघमारे, मार्गदर्शक महेश सोवनी, गुरुराज तागडे, महादेव पाटील, अतिक मुजावर, संघटन सरचिटणीस गणेश झाडे, तानाजी बनसोडे, औदुंबर वाघमोडे, पप्पू लांडगे आदींच्या उपस्थितीत सेवा समर्पण का कार्यक्रम पार पडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *