रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोहोळ तालुका व शहर नूतन कार्यकारिणी जाहीर

युवक तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे यांची माहिती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीच्या मोहोळ तालुका व शहर पदाधिकारी कार्यकारणीच्या नूतन निवडी राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याची माहिती रिपाई चे युवक तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

मोहोळ येथे जिल्हा खजिनदार विठ्ठल क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये युवक तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीच्या नवीन पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून यामध्ये कार्याध्यक्षपदी आबासाहेब कुचेकर सरचिटणीस पदी सुनील जवंजाळ, खजिनदार केदार कांबळे, उपाध्यक्ष महावीर मोरे, संघटक पदी अमोल जगताप, उपाध्यक्ष सुदीप साबळे, उपाध्यक्ष साजन जगताप, सहसचिव विक्रम भालेराव, उपाध्यक्ष दत्तात्रय नागटिळक, उपाध्यक्ष कुंदन धावणे तर मोहोळ युवक विधानसभा अध्यक्षपदी महेश कुचेकर यांच्या तर मोहोळ शहराध्यक्षपदी ज्ञानेश्वर उघडे, सरचिटणीस सागर निकांबे, कार्याध्यक्ष विशाल बनसोडे, संघटन सचिव गणेश क्षीरसागर, खजिनदार प्रदीप बनसोडे यांच्या निवडी तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी जाहीर करून नियुक्ती पत्र प्रदान केली आहेत.

यावेळी जिल्हा खजिनदार विठ्ठल क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश शेंडगे, जिल्हा चिटणीस शिरीष ढोबळे, सरचिटणीस पोपट कापुरे, राजू नागटीळक, बाळासाहेब सुतकर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *