रिपाइं च्या तालुका युवक उपाध्यक्षपदी महावीर मोरे यांची नियुक्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या मोहोळ तालुका युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी हिवरे (ता. मोहोळ) येथील महावीर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.

हिवरे (ता. मोहोळ) येथील महावीर मोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रिपाइं नेते राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या सूचनेनुसार मोहोळ तालुका युवक उपाध्यक्ष पदी महावीर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र जिल्हा खजिनदार विठ्ठल क्षिरसागर, युवक तालुकाध्यक्ष मार्तंड काळे यांच्या सहीने देण्यात आले आहे. दरम्यान निवडीनंतर पुढील काळात पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक राहून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विचारानुसार पक्षवाढी साठी काम करणार असल्याचेही नूतन तालुका उपाध्यक्ष महावीर मोरे यांनी सांगितले.

https://youtu.be/sLu7ul0tqTw

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *