तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांचे आवाहन
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाकडील संजय गांधी, श्रावणणबाळ, इंदीरा गांधी योजनांअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करणेच्या सूचना देण्यांत आलेल्या आहेत. यानुसार लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे दाखले समंधित बँकेमध्ये ३१ मे पूर्वी सादर करावे, अन्यथा त्यांना देण्यांत येणारा लाभ बंद करण्यात येणार असल्याची माहिती मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली.
याबाबत मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये म्हटले आहे की,
शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाकडील संजय गांधी, श्रावणणबाळ, इंदीरा गांधी योजनांअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करणेच्या सूचना देण्यांत आलेल्या आहेत.
यानुसार विशेष सहाय्य योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांनी हयात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना देण्यांत येणारा लाभ बंद करण्यांत येणार आहे.
यामध्ये लाभार्थी ज्या बँकेतून ते अनुदान घेत आहेत, त्या बँकेच्या मँनेजरकडे स्वतः व्यक्तीश: हजर राहणे आवश्यक असून तद्नंतर लाभार्थी हयात असल्याची नोंद बँक मँनेजर यांनी परिशिष्ट ९ मध्ये विहीत केलेल्या ठिकाणी घ्यावी, व सदरचा फॉर्म तहसिल कार्यालयाकडे सादर करतील, त्यासाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयांत येण्याची आवश्यकता असणार नाही. सदरच्या कामासाठी आवश्यक असलेले फॉर्मचा नमुना बँकेत उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदरचे कामासाठी लाभार्थ्यांनी मध्यस्थाची मदत घेणेची आवश्यकता नाही, बँकेतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत हयातीचे दाखल्यासाठी संपूर्ण सहकार्य करतील, तशा सूचना बँकेस देण्यांत आलेल्या आहेत. दि. ३१ मे २०२२ पर्यंत हयातीचे दाखल्यांचे फॉर्म बँकेमार्फत स्विकारण्यांत येतील, तदनंतर जे लाभार्थी हयात दाखला देणार नाही, अशा लाभार्थ्यांना देण्यांत येणारा लाभ जुन २०२२ पासून बंद करण्यांत येणार आहे. लाभार्थ्यांनी वरील सूचनांप्रमाणे बँकेत उपस्थित राहून हयातीचे दाखले सादर करणेबाबत अवाहन तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले आहे.
यावेळी नायब तहसीलदार लिना खरात, विभागप्रमुख सुधाकर बंडगर, वैभव सलवदे आदी उपस्थित होते.