रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नूतन प्रदेशाध्यक्ष लोकनेते ना.राजाभाऊ सरवदे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथील भारतमाता आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रिपाई युवक आघाडी मोहोळ तालुक्याच्या वतीने सस्नेह भोजनाची व्यवस्था करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. तर सय्यद वरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग निदान शिबिरात ५० विद्यार्थी तपासणी, १२ मोतीबिंदू आणि ५८ इतर तपासणी करण्यात आल्या.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहोळ तालुक्याच्या वतीने नूतन प्रदेशाध्यक्ष लोकनेते ना.राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर यावर्षी भारतमाता आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रिपाई युवक आघाडी मोहोळ तालुक्याच्या वतीने सस्नेह भोजनाची व्यवस्था तर सय्यद वरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग निदान शिबिर पार पडले.
यावेळी रिपाई सोलपुर जिल्हा खजिनदार विठ्ठल दादा क्षीरसागर, सोलपुर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश शेंडगे, युवक आघाडी मोहोळ तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे, तालुका सरचिटणीस सुनील जवंजाळ, युवक तालुका कार्याध्यक्ष आबासाहेब कुचेकर, युवक आघाडी मोहोळ विधानसभा अध्यक्ष महेश कुचेकर, युवक संघटन सचिव अमोल जगताप, तालूका खजिनदार केदारनाथ कांबळे, रिपाई तालुकध्यक्ष नानासाहेब सोनवणे, तालुका सरचिटणीस पोपट कापुरे, कार्याध्यक्ष फारुक शेख, तालुका खजिनदार मिलिंद कुचेकर, मोहोळ शाहराध्यक्ष ज्ञानेश्वर मामा उघडे, आनंद सरवदे( ग्रा.प.सदस्य. न.पिंपरी), युवक ता.उपाध्यक्ष कुंदन धावणे, महावीर मोरे, साजन जगताप,बाळासाहेब सुतकर ,आनंद कांबळे उपस्थित होते.
यासह लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसा निमित्त सय्यद वरवडे आयोजित केलेल्या नेत्ररोग निदान शिबिराचे उदघाटन रिपाई युवक अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर उघडे, मोहोळ युवक विधानसभा अध्यक्ष महेश कुचेकर, युवक तालूका उपाध्यक्ष हुसेन गायकवाड, रिपाई कार्याध्यक्ष मिलिंद कुचेकर, मोहोळ तालूका प्रसिद्धी प्रमुख शिवाजी चंदनशिवे त्याचप्रमाणे सय्यद वरवडे ग्रा.प.विद्यमान सदस्या महानंदाताई कुचेकर यांच्या हस्ते झाले. या मोफत नेत्ररोग निदान शिबिरात ५० विद्यार्थी तपासणी, १२ मोतीबिंदू आणि ५८ इतर तपासणी करण्यात आल्या.