प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन
मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून कोणता लाभ घेता येतो याची माहिती नाही, त्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. ग्रामपंचायत कडून अनेक योजना आहेत, मात्र माहीती अभावी तसेच ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांना कोणत्या योजना आहेत, असा डिजिटल बोर्ड ग्रामपंचायत मध्ये नसल्यामुळे लोकांना माहीत होत नाहीत. जनतेला फक्त ग्रामपंचायत मधून घरकुल मिळते एवढंच माहित आहे, त्यामुळे ग्रामपंचायत कडून कोणत्या योजना ग्रामस्थांना गावकऱ्यांना घेता येतील, असा डिजिटल फलक मोहोळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आले पाहिजेत. प्रत्येक घरापर्यंत शासकीय योजनेचा लाभ कसा देता येईल, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी विचार केला पाहिजे.
महात्मा गांधी जी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता पण जर स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी लोकांना शासकीय योजनांची माहीती होत नसेल तर ही शोकांतिका असून याचा विचार आपण केला पाहिजे.
परिणामी सर्व सामान्य नागरिकांना ग्रामस्थांना कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तरी लवकरात लवकर असा डिजिटल फलक प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावा अशाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाकडून मोहोळ चे गट विकास अधिकारी आनंद मिरगणे यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुकाप्रमुख वैभव जावळे, तालुका कार्याध्यक्ष अनिल पाटील, संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर, प्रसिद्धीप्रमुख विशाल मासाळ, उपाध्यक्ष नाना ननवरे, युवक तालुका उपाध्यक्ष भुतासिद्ध म्हमाणे, शरद बारडोळे, गणेश बळवंतराव, सावळाराम जावळे, अमोगसिद्ध सुतार, सोमनाथ नवत्रे आदी उपस्थित होते.