परांडा- तालुका प्रतिनिधी – विलास सुतार
आषाढी यात्रेला सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला येतात. मात्र, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणत आपल्या कामात विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज यांच्या भेटीला परंपरेप्रमाणं दरवर्षी शिराळा ते अरण विठुरायाचा पालखी पायी दिंडी सोहळा ह.भ.प पोपट महाराज सुतार याच्या नेतृत्वाखालील जातो. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
माढा तालुक्यातील अरण या सावता महाराजांच्या गावी
दरवर्षी शिराळा ते अरण विठुरायाचा पालखी सोहळा
ह.भ.प पोपट महाराज सुतार याच्या नेतृत्वाखालील
जातो. या पायी पालखी सोहळ्याची सुरवात १९६१ सालापासून झाली आहे. पंचक्रोशीतील भाविक दिंडीत सहभागी होतात. दि.२४ जुलै रोजी निघालेल्या पालखी सोहळ्याचे सर्व शिराळा परिसरातील गावकऱ्यांनी या सोहळ्याचे स्वागत केले.
कोरोनाच्या संकटामुळं मागील दोन वर्ष हा सोहळा मर्यादीत स्वरुपात झाला. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं हा सोहळ्या मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. भाविक विठुनामाच्या गजरात तल्लीन असल्याचे चित्र दिसत आहे.