डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे आयकर विभागाच्या कचाट्यात सापडले असून यांचे साखर कारखाने व पंढरपूर मधील कार्यालयावर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने धाडी टाकून चौकशी सुरू आहे.
पाटील यांची ओळख अभ्यासू साखर सम्राट म्हणून सहकार जगतात दृढ आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील ४ कारखाने चालविण्यास घेतल्याची व खरेदी केल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन तो गेल्यावर्षी यशस्वी पणे चालवून दाखवला आहे. त्यानंतर पंढरपूर मधील विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढवून जिंकल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते.
दरम्यान, धाराशिव येथील साखर कारखान्यामध्ये आणि पंढरपूर मधील कार्यालयात आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केल्याचे वृत्त आहे.