सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी ते दहावी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु…
नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी अद्यावत शाळेत सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी ते दहावी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक आण्णासाहेब शिंदे दिली.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत मोहोळ -कुरुल रोड वरील नजिक पिंपरी (ता. मोहोळ) येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी ते दहावी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील ८० टक्के जागा, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग ३ टक्के, तर अपंग प्रवर्गाकरिता २ टक्के जागा राखीव आहेत. रिक्त संख्येनुसार प्रवेश देण्यात येईल. शाळेत मोफत प्रवेश, भोजन, निवास, डिजिटल क्लासची वाय-फाय सह उच्च प्रतीची सोय, गणवेश, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, अनुभवी शिक्षक वृंद इत्यादी शासकीय नियमानुसार मिळणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता ९०११३५०९०८ या क्रमांकावर सपंर्क करावा, अशी माहिती मुख्याध्यापक आण्णासाहेब शिंदे दिली.