ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी..

भीम टायगर सेनेची मागणी

मोहोळ/धुरंधर न्युज

महापुरुषांविषयी बेताल व अपमानास्पद वक्तव्य करणारे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष लखन घाटे यांनी केली आहे.

याबाबत भीम टायगर सेनेच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषण करतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह, बेताल व अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे अनेकांची मने दुखावली आहेत, पर्यायाने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्या या वक्तव्यामुळे शाहू, फुले आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या असून जनतेमध्ये असंतुष्ट लाट पसरली असल्याचे सांगून शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचेही दिलेल्या निवेदनामध्ये भिम टायगर सेनेचे लखन घाटे यांनी सांगितले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *