नववधूने लग्नापूर्वी दिली ही परीक्षा मग लग्नाची परिक्षा

नवरीचे होतेय सर्वत्र कौतुक…

धुरंधर न्युज प्रतिनिधी

लग्न घटिका समीप आली की नववधूने तात्काळ लग्नमंडपात हजर राहण्याचे आवाहन केले जाते. माञ लग्नघटिका अर्ध्या तासावर आली असतानाही नववधूने आपल्या मेकअप व बाशिंग सह पहिल्यांदा बारावीच्या परीक्षा देण्याचे कर्तव्य पार पाडले.

याचे झाले असे की, अक्कलकोट येथील कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दि.१८ मार्च रोजी इ.१२ वी परीक्षेच्या इतिहास विषयाच्या परीक्षेत नववधु चि.सौ.का. काशिबाई देवेंद्र कोळी हिने हजेरी लावली. विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात तिने विवाह नोंदणी केली होती.

अक्षता गोरजमुहूर्तावर सायं. 6:36 वा. पडणार होते. तरी देखील दु.3 ते 6 पर्यंत वधुनी तीन तास परीक्षा देऊन अक्षतासाठी बोहल्यावर चढली. लग्नातील सर्व विधी पूर्ण करून परीक्षेस उपस्थित राहिली. तिची शिक्षणाबद्दल असलेली धडपड पाहून सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *