२७ मार्च ते १२ एप्रिल अर्ज सादर करण्याचा कालावधी
धुरंधर न्यूज/बालाजी शेळके (8999509144)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत मोहोळ तालुक्यातील ९, मोहोळ शहर ३ तर अनगर नगरपंचायत १ अशा एकुण २३ रिक्त अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका व एकुण ४६ मदतनीस यांच्यासाठी मेगाभरती भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक महिलांनी अर्ज २७ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील अंगणवाडी विभागातील रिक्त असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी रिक्त असणाऱ्या जागेवर मेगा भरती करण्यात येणार असून यामध्ये तालुक्यातील ९ , मोहोळ शहर ३ तर अनगर नगरपंचायत १ अशा एकुण २३ रिक्त अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका व एकुण ४६ मदतनीस यांच्यासाठी मेगाभरती भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक महिलांनी अर्ज २७ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये अर्ज स्विकारले जाणार आहेत. यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
यामध्ये मोहोळ तालुक्यातील सौंदणे, दाईंगडेवाडी, मलिकपेठ, कोळेगाव, वाघोली, कोरवली, आष्टी, मुंडेवाडी, कोन्हेरी या ९ गावात तर मोहोळ शहरामध्ये मांडवे वस्ती, कन्या प्रशाला, नवा जनाचा मळा या ठिकाणी ३ जागा तर अनगर नगरपंचायत हद्दीमध्ये पाचपीर येथे १ अशा एकूण १३ अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे.
यासह मोहोळ तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस साठी हिंगणी निपाणी, चिंचोलीकाटी, भोयरे, नरखेड, अर्धनारी, बेगमपूर, वाघोली, वाघोली, हरळवाडी, जामगाव बुद्रुक (२), कामती खुर्द (२), विरवडे बुद्रुक, टाकळी सिकंदर (२), पोखरापूर, अंकोली (२), ओनढी, तांबोळे, देवडी, हिवरे, यावली (२), शेटफळ, बैरागवाडी, आष्टी, येवती, पापरी (२), बिटले, वाफळे, गोटेवाडी याठिकाणीं एकुण ३५ जागा तर मोहोळ नगरपरिषद हद्दीमध्ये अण्णाभाऊ साठे नगर, बुधवार पेठ, गाढवे वस्ती, देशमुख नगर या ठिकाणी ४ अंगणवाडी मदतनीस तर अनगर नगरपंचायत हद्दीमध्ये अनगर क्रमांक १, अनगर क्रमांक २, शंकरनगर क्रमांक ५, आंब्याचा मळा क्रमांक ९, लोहार गल्ली क्र.१०, डिकोळे गल्ली क्रमांक ११, कोंबडवाडी सरक वस्ती क्रमांक १७ या ठिकाणी ७ अंगणवाडी मदतनीस अशा मोहोळ तालुक्यात एकूण ४६ अंगणवाडी मदतनीस भरती होणार आहे.
तरी पात्र असणाऱ्या इच्छुक महिलांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले आहे.