मोहोळ येथे मनसे गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
मोहोळ/धुरंधर न्यूज
महाराष्ट्रात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच उभी राहिली आहे. शेतकऱ्यांचे ही विविध प्रश्न सोडवण्यासाठी मनसे यापुढेही आग्रही भूमिकेत राहणार असून ग्रामीण भागातील लोककलावंतांचेही विविध प्रश्न सोडवण्यासाठी यासह मोहोळ येथे लोककलावंतांचा मेळावा घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले.
मोहोळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मनसे गौरव पुरस्कार २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे हे बोलत होते. यावेळी मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मनसे गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये ॲड. पांडुरंग माने, पत्रकार बालाजी शेळके, सिने कलाकार अमोल महामुनी, शाहीर राजाभाऊ वाघमारे, लोक गायक दत्तात्रय धायगुडे, प्रगतशील शेतकरी लक्ष्मण बाबर यांना मनसे गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. हिंदुराव देशमुख, तालुकाध्यक्ष ॲड.कैलास खडके, शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे, विधानसभा अध्यक्ष विष्णू गायकवाड, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संजय पडवळकर, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सोमनाथ पोळ, तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहर संघटक उत्तरेश्वर शिंगाडे, गणेश गायकवाड, आकाश मेलगे, राहुल तावसकर, समाधान सावंत, वैभव राजगुरू, सचिन चव्हाण, आकाश गायकवाड आदीसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी तर आभार शाहूराजे देशमुख यांनी मानले.