अंबिका विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन संपन्न

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस & उर्मी संस्था पुणे यांचा पुढाकार

मोहोळ/ धुरंधर न्युज

जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस & उर्मी संस्था पुणे यांच्या विज्ञासा प्रोजेक्ट अंतर्गत अंबिका विद्यामंदिर शिरापुर सो ता. मोहोळ येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

विज्ञान प्रयोगात इयत्ता 6 वी ते 9 वी विद्यार्थ्यानी सहभाग.. घेतला प्रयोगात आधुनिक समस्या, बुरशीचे निरीक्षण व त्यामुळे मानवाला होणारे आजार, हवेच्या दाबावर आधारित प्रयोग ,कप्पी वापर , खराब झालेले विद्युत बल्ब परत सुरू करणे, आम्ल आम्लारी पदार्थ ओळखणे, क्षारयुक्त पाण्या मधून होणारे विद्युत वहन, जलतरंग निर्मिती असे बरेच प्रयोग विद्यार्थ्यानी सादर केले.

या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक राम तेलगर, रमेश हक्के, राजन माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी.जी कुलकर्णी यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शास्त्रज्ञ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी  प्रदर्शनास उपस्थित राम तेलगर, रमेश हक्के, सचिन राजगुरू, सौदागर चव्हाण, बाळासाहेब शिरसागर, राजन माने, सुनिता सिताप, संगीता मस्के, श्रीराम घरबुडे व गणेश मसलकर, रोहन गायकवाड, उर्मी संस्थेचे चे प्रोजेक्ट कोओरडीनेटर सिद्धेश्वर बंडगर ही प्रयोगाची पाहणी केली. विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *