मोहोळ/धुरंधर न्युज
अंजली वस्त्रे यांनी मोहोळ तालुका महिला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला ,त्यानंतर अंजली वस्त्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच महिला आघाडी संपर्कप्रमुख तथा उपनेत्या संजनाताई घाडी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ साहेब ,सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली वस्त्रे यांची शिवसेना मोहोळ तालुका महिला आघाडी तालुका समन्वय पदी निवड करण्यात आली ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ध्येय धोरण व पक्षाचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून, पक्ष संघटना मजबूत करावी त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सीमा पाटील यांनी स्वागत करून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला आघाडी शहर प्रमुख प्रज्ञा माळी, अंजली मोहिते , छबुताई काळे, मीरा शिराळ, बानु शेख, सविता शिरसाट, कमरुनिसा पठाण, समरीन शेख उपस्थित होते.