दि.३० मार्च रोजी कुरुल ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करावा म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे व ग्रामसेवक घाटे मॅडम यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. चर्चमध्ये आपण अपंग बांधवांच्या ५ टक्के निधी लवकरच वाटप करू असे आश्वासन दिले होते.
त्यानंतर दि.३० मार्च रोजी कुरुल गावातील ५० अपंग बांधवांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा चेक सरपंच व ग्रामसेवक यांच्या हस्ते देण्यात आला.एक हजार रुपयांचा किराणा बाजार गुढीपाडव्यानिमित्त भेट म्हणून वाटप करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच चंद्रकला माणिक पाटील, उपसरपंच पांडुरंग आबा जाधव, ग्रामसेवक घाटे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ अण्णा जाधव, बाळासाहेब लांडे, सिताराम लांडे, प्रकाश जाधव, धनाजी माळी, आनंद जाधव, ग्रा. पं. सदस्या . मोहिनी घोडके, संगिता माळी, रोहिणी तगवाले, रुक्मिणी माळी, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जाधव, अमोल खंदारे, संभाजी घोडके, संतोष कुंभार, लांडे मॅडम व अपंग बांधव उपस्थित होते.