कोळेगाव हद्दीतील दिनेश गाडे यांच्या मालकीच्या शेतामध्ये असणाऱ्या पॉलिहाऊस व डाळिंब, चिक्कू, आंबा, नारळ अशा विविध झाडांना वर्धमान फर्टीलायझर परिसरातील असणाऱ्या टॉवरच्या टूल बॉक्समध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत सुमारे ८० लाख रुपये नुकसान झाल्याची घटना दि.१ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळेगाव हद्दीतील वर्धमान फर्टीलायझर जवळ दिनेश गाडे यांच्या गट नंबर १२३, १२७, १२८ या शेतातील पॉलीहाउस मध्ये असणारे डाळिंब, चिकू, पेरू यासह नारळाची व आंब्याची अशी झाडे असून दि. १ एप्रिल रोजी दुपारी अचानक शेताजवळ असणाऱ्या टॉवरच्या टूलबॉक्स मध्ये इलेक्ट्रिक बिघाड झाल्याने अचानक शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत पॉलीहाऊस सह विविध फळांची रोपे तसेच इलेक्ट्रिक मोटर केबल असा सुमारे ८० लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची खबर दिनेश गाडे यांनी दिली असून याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात जळीत दाखल करण्यात आले आहे अधिक तपास ए. एस. आय युसूफ शेख करत आहे.