सरकारच्या नाकर्तेपणामुळे भारनियमनाचा भार जनतेच्या माथी : खुपसे-पाटील

राज्याला विजेच्या संकटातून बाहेर काढा : खूपसे-पाटील

राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे, उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. उकाड्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. अशा अवस्थेत महाविकास आघाडी सरकारकडून जनतेला जाणून बुजून त्रास देण्याचे काम सुरू असून कोळसा नसल्याने भारनियमन होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचा घणाघात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे-पाटील यांनी केला.

 पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजातील एक घटक सुखी नाही. शेतकर्‍यांची वीज तोडणी करून शेतकऱ्यांना आर्थिक डबघाईला आणण्याचे महापाप या लोकांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे वीज तोडणी थांबवली असली तरी पुन्हा एकदा विजेचा प्रश्न या सरकारने ऐरणीवर आणला आहे. राज्यातील तापमानाचा पारा ४५ औषध सेल्सिअसच्या घरात गेला आहे. त्यामुळे जनतेला घरात बसल्याशिवाय पर्याय नाही. आणि घरामध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाईट नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार जनता सहन करत असून कोळसा नसल्याकारणाने जर वीज उपलब्ध होत नसेल तर मंत्र्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे. अशा लोकांना खुर्च्यावर बसायचा अधिकार नाहीच असा घणाघात करून एकीकडे सरकारमधील मंत्री रोज एक घोटाळा करून जेलमध्ये जात आहे तर दुसरीकडे तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे एकमेकावर नुसते आरोप सुरू आहेत. या पक्षांच्या आणि नेत्यांच्या साठमारीत जनता भरडली जात आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब विजेची २४ तास सोय करावी आणि जनतेला उष्माघाताच्या लाटेतून बाहेर काढावे, असेही यावेळी खूपसे पाटील यांनी सांगितले.

 यावेळी उमाकांत तिडके, रुफ पटेल पांडू भोसले बाबाराजे कोळेकर, विनिता बर्फे, शर्मिला नलवडे, दीपाताई डिरे, राणा महाराज वाघमारे, अनिल शेळके, संतोष कोलगे, बालाजी तरंगे, रामराजे डोलारे, अक्षय देवडकर, सागर शिंदे, किशोर शिंदे, शरद एकडं, वैभव मस्के, रोहन नाईकनवरे, कल्याण गवळी, हर्षवर्धन घोडके, नितीन जगताप, सूरज धोत्रे, बालाजी तरंगे, अक्षय शिंदे, महोन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *