ग्रँड मास्टर यांच्या हस्ते काळे यांना डिग्री बहाल
ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी च्या वतीने हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे सीनियर ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग साठी घेण्यात आलेल्या परीक्षेत क्रांतिवीर भगतसिंग कराटे आणि स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी यश मिळवले असून ग्रँड मास्टर एस. श्रीनिवासन यांच्या हस्ते त्यांना डिग्री बहाल करण्यात आली. ही तिसरी डिग्री मिळवणारे मोहोळ तालुक्यात दशरथ काळे हे एकमेव आहेत.
सीनियर ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग साठी दि.२३ मे ते २५ मे दरम्यान ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी च्या वतीने हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे ग्रँडमास्टर एस. श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली. तर सहाय्यक म्हणून सेन्साई रमेश (हैदराबाद, आंध्र प्रदेश), सेन्साई उल्लकणाथण (बेंगलोर, कर्नाटक), सेन्साई मो. मन्सूर पशा (आंध्र प्रदेश) यांनी काम पाहिले. या परीक्षेत कुमिते (फाईट), काता, डिफेन्स अँड अटॅक टेक्निक हे प्रकार घेण्यात आले.
दरम्यान मोहोळ तालुक्यातुन ओकिनावा मार्शल आर्ट्सचे सीनियर ब्लॅक बेल्ट तिसरी डिग्री मिळवणारे दशरथ काळे हे एकमेव असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.