सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस ओ.बी.सी. सेलच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी.
महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत सद्या राज्यभर ओबीसी इंपीरीकेल डाटा आडनावावरून करण्याचे काम सुरू आहे. आडनावावरून गणना करण्याची पद्धत चुकीची आहे. आडनावावरून जात ठरविणे शक्य नाही, तरी मागासप्रवर्ग जातीचा वस्तुनिष्ठ अहवाल गावागावातून, शहरातून तयार करून अचूक इम्पेरिअल ओबीसीचा डेटा पाठवतात व सदरची अडनावावरून जातीची गणना करण्याची पध्दत रद्द करण्याची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींदजी शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, लतीफभाई तांबोळी, साधनाताई राऊत, विजयकुमार पोतदार, आप्पाराव कोरे, कुसुमय्या तांबोळी, राजेश सुतार, परमेश्वर कोरे, शिवानंद बडे, स्वामीनाथ पोतदार, बिपीन करजोळे, बापूराव साठे, सुद्याम शिंदे, तानाजी पवार, अभिजीत पाटील, ईस्माईल मुल्ला, रवीराज पवार, गौतम क्षीरसागर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.