पंढरपूर ते कुरुल या तिर्हे मार्ग रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत आषाढी यात्रा कालावधीत या मार्गावरून अनेक पालख्या जातात त्यामुळे हा मार्ग पालखी मार्ग म्हणून जाहीर करावा व रस्त्याची विस्तारीकरण करून रस्त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका यांच्यावतीने तालुका अध्यक्ष अमोल माळी यांनी मंत्रालयात समक्ष भेटून मुख्यमंत्री महोदयांना दिले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून या रस्त्यावरून वाहतूक करणे अवघड झाले आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या रस्त्यासाठी भर रस्त्यावर जागरण गोंधळ कार्यक्रम करून शासनाला व प्रशासनाला जागा आणण्याचा प्रयत्न केला होता बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी सोलापूर व मुंबई येथेही वेळोवेळी निवेदने दिली आहेत.परंतु अद्याप या रस्त्याविषयी काहीच ठोस भूमिका घेतली जात नाही त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री या नात्याने यात लक्ष घालून रस्ता पालखी मार्ग व विस्तारीकरण नूतनीकरण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मोहोळ तालुका महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी रस्त्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले व रस्ता नूतनीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. यावेळी पंढरपूर तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, मोहोळ तालुका कार्याध्यक्ष शिवाजी भानवसे आदी उपस्थित होते.