सोलापूर/प्रतिनिधी
भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवार २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर (मुळे सभागृह) येथे संपन्न होणार असल्याचे संयोजक तथा राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष,मंत्रालय समन्वय समिती सदस्य बापूसाहेब आडसूळ यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, शिक्षण उपसंचालक पुणे औदुंबर उकिरंडे (शिक्षण उपसंचालक पुणे) राजेश क्षीरसागर (उपसंचालक पुणे ) औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, मंत्रालय समन्वय समिती, कक्ष अधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ५० पुरस्कार वितरण करणार आहोत, तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी केले आहे.