सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांची मागणी
परतीच्या पावसाने आष्टी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, द्राक्ष, कांदे, टोमॅटो, डाळिंब आदिसह पिकांचे अतोनात नुकसान झाले असून घराचीही पडझड झाली आहे. परिणामी प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आष्टीचे सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी केली आहे.
याबाबत आष्टीचे सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी परिसरामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात फळबागांसह तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासह अनेक राहत्या घराचीही पडझड झाली असल्याने सामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत आष्टी ग्रामपंचायतीमध्ये ही झालेल्या ग्रामसभेमध्ये अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई बाबत ग्रामपंचायत सदस्य धनाजी व्यवहारे यांनी सूचना केली होती. या ठरावाला उपसरपंच निखिल गुंड यांनी अनुमोदन दिल्या बाबतचे पत्र या निवेदनाबरोबर डॉ. अमित व्यवहारे यांनी जोडले आहे.