बंडखोरी होऊ नये म्हणून घेतला महाडिकांनी निर्णय…
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी आज खा. धनंजय महाडिक स्वतः व विश्वराज महाडिक हे सोलापूर येथे अर्ज भरणार असून बाकी इच्छुकांनी थेट अर्ज न भरता पुळूज येथे प्रथम अर्ज भरावेत, थेट भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे आवाहन पुळूज येथील सभेत खा. धनंजय महाडिक यांनी केले असून इच्छुकांची संख्या भरपूर असल्याने तसेच बंडखोरी होऊ नये, यासाठी विशेष काळजी भीमा परिवाराकडून घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
भीमा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भीमा परिवाराच्या कार्यकर्त्यांची सहविचार- विनीमय मेळावा पुळूज येथे दि.२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सतीश जगताप, भाजप नेते संतोष पाटील, माजी उपसभापती मानाजी माने, युवा नेते विश्वराज महाडिक, संजय डोंगरे, शिवाजी गुंड, तानाजी गुंड, शंकर वाघमारे,पवन महाडिक, सर्जेराव चवरे, शैला गोडसे, चेतन पाटील, संभाजी माने, बब्रुवाहन माळी, संजय विभूते, हनुमंत कसबे, राहुल क्षीरसागर, सुनील चव्हाण, विनोद महाडिक, विक्रांत माने, राहुल गुंड, शाहीर हावळे, पांडुरंग बचुटे, संतोष चव्हाण, जमीर मुजावर, सुनील बचुटे, चरणराज चवरे, रमेश माने, सौदागर खडके, सुरेश शिवपूजे, लिंगदेव निकम, महादेव देठे, अंकुश अवताडे,युवराज चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी उपसभापती मानाजी माने म्हणाले, भीमा कारखाना बिनविरोध होईल असे मी मागील सहा महिन्यापूर्वी सांगितले होते, स्वतःची इस्टेट तारण ठेवून कारखान्या साठी पैसे उपलब्ध करणारे खासदार महाडिक हे एकमेव चेअरमन असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांना भीमा साखर कारखाना यापूर्वी एकदा बिनविरोध आम्ही निवडून दिला होता, आता सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी कारखाना विरोधकांनी मन मोठे करून, कारखाना बिनविरोध करण्याचा सकारात्मक विचार करावा. असे विनंतीपूर्वक आवाहन भीमा कारखान्याचे अध्यक्ष तथा नुतन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
यावेळी राजकुमार पाटील, संभाजी कोकाटे, ज्ञानेश्वर पाटील, बंडू मुळे, संग्राम चव्हाण, सुरेश पवार, चंद्रकांत निकम, बालाजी वाघ, पप्पू पाटील, लिंगदेव देशमुख, पांडुरंग बचुटे, प्रल्हाद फाळके, स्वामी महाराज, अर्जुन चव्हाण, शक्तिमान माने, विलास दाईगडे, दिगंबर माळी, डॉ. गुंड, रवी देशमुख, नाना भुई, सुशील खुर्द, दिलीप पाटील, बाळासाहेब पवार, चरणराज चवरे, छगन पवार, भीमराव वसेकर, सुनील चव्हाण, लिंगदेव निकम, हनुमंत कसबे, चेतन पाटील, सुरेश हावळे, शैला गोडसे, महादेव देठे, शंकर वाघमारे, संतोष पाटील, मानाजी माने यांनीही आपल्या मनोगतातून विचार व्यक्त करीत उमेदवारीचे सर्वाधिकार दिले. यासह इच्छुकांनी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना संधी देण्याची मागणी केली. तर नवीन चेहऱ्यांना व युवकांना संधी द्यावी यासह विश्वराज महाडिक यांनाही संधी देण्याची मागणी करीत जुन्या संचालकांना बदलण्याची मागणीही काही कार्यकर्त्यांनी केली. सूत्रसंचालन पांडुरंग ताठे यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील अनगरकर विरोधक शिवसेना, भाजप यांनी कायमच महाडिक परिवाराला सहकार्य केले आहे, त्यातच लोकशक्ती परिवार ही महाडिक यांच्यासोबत असतानाच तालुक्यातील राजन पाटील यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू असलेल्या उमेश पाटील गटातील मानाजी माने, संजय विभूते, राहुल क्षीरसागर, आण्णा पाटील, विक्रांत माने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व्यासपीठावर दिसून आले. यावर बोलताना खा. महाडिक म्हणाले की, सहकारात पक्षीय राजकारण नसते, यास्तव दुश्मन का दुश्मन अपना मित्र या युक्ती प्रमाणे जे बरोबर येतील त्यांना घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.