उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बांधावर जाऊन शेतकरी व शेतमजूरांना रेनकोट वाटप

भाजपचे अंकुश आवताडे यांचा उपक्रम

मोहोळ/धुरंदर न्यूज

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली, कित्येकांना जीव गमवावे लागले तर राज्यात अनेक ठिकाणी पूर आणि अतिवृष्टी झाली. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन करत कुठेही बॅनरबाजी, पोस्टरबाजी, जाहिरातबाजी, हारतुरे असे न करता सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करा असे सांगितले होते. उपमुख्यमंत्र्याच्या या आवाहनाला साद देत तसेच भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी, शेतात काम करणारे शेतमजूर, माळरानावर शेळ्या-मेंढ्या, गुरे-ढोरे राखणाऱ्या पशुपालकांना रेनकोट व छत्री वाटप करत सामाजिक उपक्रमाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा राज्य कार्यकारिणीची निमंत्रित सदस्य संजीव खिलारे तर प्रमुख पाहुणे भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप हे होते.

यावेळी बोलताना अंकुश आवताडे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही सामाजिक कार्य करणारी पार्टी आहे. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी आपले योगदान दिले आहे. तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचे युगपुरुष राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी अविरतपणे कार्य करत आहेत. या दोघांनी आजपर्यंत निष्कलंक, भ्रष्टाचार विरहित काम केले आहे. त्यामुळे जगभरात यांचा डंका वाजत आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरे करण्याचे आयोजन केले.

दरम्यान यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप, नवमतदार नाव नोंदणी, वृक्षारोपण या कार्यक्रमांबरोबर परिसरातील पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप व त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.

यावेळी बेगमपूर चे माजी सरपंच सरपंच हरिभाऊ काकडे, पीरटाकळीचे सरपंच महेश धुमाळ, शेजबाभुळगाव चे सरपंच दीपक गवळी, परमेश्वर पिंपरी चे सरपंच दीपक पुजारी, कोरवलीचे माजी सरपंच सुरेश महमाने, विरवडे बुद्रुकचे सरपंच बाबासाहेब अंकुश, मा.उपसरपंच दिनकर पवार, गुरुराज तागडे, दयानंद तारके, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश कुलकर्णी, अशपाक बागवान, देविदास नाईकनवरे, सुभाष शिंदे, योगेश शिंदे, नानासाहेब ननवरे, प्रकाश गव्हाणे, आनंद तीर्थे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व अंकुश अवताडे मित्र परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास घोडके तर आभार दिनकर पवार यांनी मांडले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *