सोलापूर जिल्हा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चरणदास चवरे यांची निवड झाल्याबद्दल युवा कार्यकर्ते गुरुराज गव्हाणे यांच्या हस्ते चवरे यांचा सन्मान करण्यात आला.
राज्याची कॅबिनेट मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक व निकटवर्तीय मानले जाणारे चरणराज चवरे यांच्या पक्षातील व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे युवा कार्यकर्ते तथा चरणराज चवरे समर्थक गुरुराज गव्हाणे यांनी चवरे यांच्या निवडीबद्दल यांचा सन्मान केला.
यावेळी मुन्ना पाटील, अतुल डोके, नाथा पवार, धनु फंड, नामदेव सरवळे, संजय आगलावे आदिंसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
गव्हाणे यांना मिळणार तालुक्यात मोठी जबाबदारी जबाबदारी-
चरणरज चवरे हे शिवसेनेचे मोहोळ तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असताना गुरुराज गव्हाणे हे मोठ्या ताकतीने पाठीमागे उभा राहिले होते. यासह त्यांचा अंकोली परिसरामध्ये मोठा जनसंपर्क आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना मोहोळ तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असून यासंबंधी नूतन जिल्हाप्रमुख चवरे यांच्याकडे तशी मागणी ही करण्यात आली आहे.