मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पहिले साहित्य संमेलन गोव्यात संपन्न झाले या संमेलनात मोहोळच्या साहित्यिक डॉ. स्मिता पाटील लिखित “नाही गिरवता येत कुठलीच लिपी ” या काव्य संग्रहास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.महेश खरात यांच्या मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पाहिले साहित्य संमेलन गोव्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या संमेलनात मोहोळच्या साहित्यिक डॉ.स्मिता पाटील लिखित ” नाही गिरवता येत कुठलीच लिपी ” या काव्य संग्रहास केंद्रीय सांस्कृतिक व पर्यावरण मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते तसेच माजी कायदा मंत्री रमाकांत खलप ,जेष्ठ साहित्यिक रविंद्र शोभणे यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कविता संग्रहास या अगोदर शब्दकला साहित्य संघाच्या’ साहित्यरत्न पुरस्कार’, अमरावती येथील ‘स्मृ.शे.भाऊराव सरदार साहित्य पुरस्कार’ ,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मंगळवेढा यांचा ‘पद्मिनी कृष्णा यादव पुरस्कार आदि पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथील दक्षिण साहित्य सभा यांचा विशेष पुरस्कार ही या काव्यसंग्रहास झाला आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. प्रमोद पाटील, प्रा. मुकुंद गायकवाड आदींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी डॉ. स्मिता पाटील यांचे अभिनंदन केले.