आमदार यशवंत माने यांची माहिती
मोहोळ/धुरंधर न्युज
राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहोळ येथे दि.१२ डिसेंबर पासून राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे भव्य आयोजन केले असल्याची माहिती आ.यशवंत माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ येथील नागनाथ विद्यालय मैदानामध्ये दि.१२ डिसेंबर सुरु होणाऱ्या सदर स्पर्धेमध्ये उस्मानाबाद, पुणे, नवी मुंबई, वाडी कुरोली, सातारा, नाशिक, रत्नागिरी, रांजणी (पुणे), कुपवाड (सांगली), अहमदनगर, ठाणे ,सोलापूर ,सांगली , मंगळवेढा आदी राज्यस्तवर खेळलेले संघ या स्पर्धेसाठी बोलवोले आहेत . या स्पर्धेचे उदघाटन माजी क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ५१००० हजार रुपयांचे पारितोषिक चषक व सन्मान पत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत वैयक्तिक खेळाडूना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन आ. यशवंत माने यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, शहराध्यक्ष रुपेश धोत्रे, राजाभाऊ सुतार, शकील शेख, गौतम क्षीरसागर, विजय कोकाटे, अनंत नागनकेरी, दत्तात्रय खवळे, संतोष खंदारे, जावेद बागवान, अझरुद्दीन शेख, अतूल गावडे, संभाजी चव्हान, धनंजय रणवरे, संतोष ननवरे आदि उपस्थित होते.