“त्या” नराधमाला फाशीची कठोर शिक्षा द्या..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीची मागणी

मोहोळ/धुरंदर न्यूज

नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव याची हत्या करणाऱ्या जातीवादी गावगुंडावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मोहोळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी (आठवले गट) यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत दि.५ जुन रोजी मोहोळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का केली, असे म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव या समाजसेवकाची पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रातील मनुवादी वृत्तीच्या गावगुंडांनी भोकसून दिवसाढवळ्या खून केला आहे. तरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल जाहीर निषेध करून या गावगुंडांचा सूत्रधार व जे कोणी मारेकरी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना फासावर लटकवण्याची मागणी निवेदनाद्वारे मोहोळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा खजिनदार विठ्ठल क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे, मोहोळ तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर उघडे, सरचिटणीस पोपट कापुरे, युवा सरचिटणीस सुनील जवंजाळ, तालुका संघटक रजनीश कसबे, कार्याध्यक्ष आबासाहेब कुचेकर, उपाध्यक्ष शहाजी मस्के, बाबासाहेब कसबे, सुशील शिवशरण, अंकुश शेंडगे, मोहन जवंजाळ, महेश कुचेकर, शिवाजी चंदनशिवे आदींच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *