सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती शाहीन शेख यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो अंतर्गत काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात पक्षाला अधिक बळकटी येण्यासाठी आणि पक्षाचे पुनर्बांधणी करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रांतिक सदस्यपदी नियुक्ती केली आहे. यामध्ये मोहोळच्या माजी नगराध्यक्ष शाहीन शेख यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाच्या विचाराधारेशी संलग्न विविध उपक्रम राबवून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न केलेल्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने प्रांतिक सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची प्रांतिक सदस्य पदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या प्रांतिक सदस्य कमिटीमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विद्यमान जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर यासारखे दिग्गज मंडळी असून आता श्रीमती शाहीन शेख यांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.