नदीपात्रामध्ये वाळू काढण्यासाठी बेकायदेशीर मुरूम उपसा करून रस्ता करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा… सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांची मागणी

भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नसताना वाळू ठेकेदार अवैधरित्या मुरूम उपसा करीत नदी पात्रांमधून वाळू उपसा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परवानगी देण्याच्या अगोदरच अवैध मुरूम उपसा करून नदीमध्ये रस्ता करणाऱ्या वाळू ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून वाळू उपसा करण्यास परवानगी नाकारण्याची मागणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मोहोळ, मंगळवेढा साठा क्र-१, घोडेश्वर, तामदर्डी साठा क्र-२ ला भीमा नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी ठेका मंजूर करण्यात आला आहे. मात्र अजुनही वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिलेली नसतानाही संबंधित वाळू ठेकेदारांनी अवैधरित्या मुरूम उपसा करून नदी पत्रांमधून वाळू उपसा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. अवैधरित्या मुरूम वाहतूक करून एवढ्या घाईगडबडीने जर नदीपात्रामध्ये रस्ता बनवण्यात येत असेल तर वाळू उपशाला परवानगी दिल्यानंतर रात्रंदिवस संबंधित वाळू ठेकेदार अवैद्य वाळू उपसा करतील, दरम्यान अवैद्य मुरूम वाहतूक करणारे टिपर माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांनी पकडून कामती पोलीस ठाण्यात कडे स्वाधीन केले होते. कामती पोलीस ठाणे यांनी त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी मोहोळ तहसीलदार यांच्याकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे या जिल्हाधिकारी व शासनाच्या नियमाचा भंग करून अवैद्य वाळू उपसा करणार्‍या वाळू ठेकेदारांवर कारवाई करून वाळू उपशाला परवानगी देऊ नये, अन्यथा संबंधितांवर न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे निवेदन शरद कोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *