सोलापूर-
शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे. त्यांच्या आगलावे धोरणामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, ते कुठतरी आतां थांबलं पाहिजे असं म्हणाताना सदाभाऊ खोत यांनी एका घरात आग लावायची तिथलं झालं की दुसऱ्या घरात आग लावायला जायचं काम शरद पवार करतात.
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असून दि.२९ रोजी ते पत्रकारांशी बोलत होते. सांगलीतल्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या स्मारकाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उदघाटन केले. याबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.
सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याच तोंडावर थुंकी उडते, एवढं ज्ञानही सदाभाऊंना नाही -अमोल मिटकरी
दरम्यान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सदाभाऊ खोत यांची आमदारकीची टर्म संपलेली आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, त्यांना पुन्हा आमदारकी पाहिजे. त्यामुळे कदाचित सदाभाऊच्या ..ला आग लागली असावी’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.