
मोहोळकरांची वाढती गर्दी – मोबाईल साहित्य व ॲक्सेसरीजवर आकर्षक दरात खरेदीची संधी
मोहोळ प्रतिनिधी :
गणेशोत्सव हा आनंद आणि खरेदीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर मोहोळ येथील सोना मोना मोबाईल ॲक्सेसरीज या लोकप्रिय दुकानाने ग्राहकांसाठी विशेष सवलतींचा महापूर आणला आहे. दुकानात मोबाईल डिस्प्ले, कव्हर्स, चार्जर्स, इअरफोन्स, टेम्पर्ड ग्लास, स्पीकर्स, स्मार्ट वॉच आदी ॲक्सेसरीजवर विशेष कमी किमतींच्या ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत.

या योजनेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांची दुकानाबाहेरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. “हव्या त्या वस्तू योग्य दरात मिळत आहेत” असे समाधान ग्राहकांनी व्यक्त केले.
दुकानदारांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आनंदाचा सण आहे. या सणात लोकांना कुटुंबासाठी व स्वतःसाठी हवे ते मोबाईल साहित्य कमी किमतीत मिळावे, यासाठी ही ऑफर सुरू केली आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.”
ग्राहकांच्या मते, बाजारात वाढलेल्या दरांच्या तुलनेत सोना मोना मोबाईल ॲक्सेसरीज मध्ये मिळणाऱ्या या सवलती खूपच अत्यंत परवडणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव खरेदीसाठी हे ठिकाण एक आकर्षण बनले आहे.