भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, मोहोळ यांचे तर्फे आरोग्यम् ओ.पी.डी.हाऊस, मोहोळ येथे दि.१६ ऑगस्ट रोजी “मोफत आरोग्य तपासणी शिबिर” पडले. या शिबिरात सुमारे १५० रुग्णांनी सहभाग नोंदवला.
या शिबिरात सुप्रसिद्ध कन्सल्टिंग फिजीशियन डॉ. अच्युत नरुटे यांनी जवळपास १५० रुग्णांची तपासणी केली, तसेच सर्व रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. तसेच औषधेही मोफत देण्यात आली. कार्यक्रमाचे राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दरम्यान डॉ. अच्युत नरुटे दररोज आरोग्यम् ओ.पी. डी.हाऊस येथे उपलब्ध असणार असल्याची माहितीही यावेळी आयोजक सचिन शास्त्री यांनी दिली.
यावेळी संतोष शेंडे, जहांगीर मुजावर, बाबासाहेब विटेकरी, बापू सुर्यवंशी, रजनीकांत सुतार, प्रवीण आंडगे, गणेश राजमाने, विजयानंद स्वामी, ज्ञानेश्वर सिताप, सकलभूषण गुमते, अमोल वराळे आदि उपस्थित होते.