यंदाच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने पेनूरचे अमीन पाटील सन्मानित

पेनूर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सहशिक्षक
अमीन जैनुद्दीन पाटील यांच्या विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन शिक्षक दिनानिमित्त आविष्कार सोशल अँन्ड एज्युकेशनल फौंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने दिला दाणारा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आविष्कार फौडेशनच्या वतीने रविवारी डाँ. निर्मलकुमार फडकुले सभाग्रह, सोलापूर येथे सोलापूर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त दिपक आर्वे, आविष्कार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते प्रमाणत्र व मानपत्र देऊन अमीन जैनुद्दीन पाटील यांचा यथोचित सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे उपस्थित होते.

दरम्यान अमीन जैनुद्दीन पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे प्रशालेचे अध्यक्ष, संचालक, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *