कोरोना च्या काळामध्ये बंद झालेला मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत ची मागणी महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली असून यासंबंधीचे निवेदन मार्केट कमिटीचे सचिव सचिन पाटील यांना देण्यात आले.
याबाबत महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जनावरांचा बाजार खूप वर्षापासून चालू होता, परंतु मध्यंतरी कोरोना च्या काळात हा जनावरांचा बाजार बंद झाला, त्यामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्या गावाजवळच पशुपालकांना योग्य किमतीत जनावरे विकण्याची संधी उपलब्ध होत होती, मात्र जनावरांचा आठवडा बाजार बंद असल्याने लांब व दूरवर जनावरे घेऊन जाऊन कमी किमतीत जनावरे विकण्यास शेतकऱ्यांना भाग पडत असून जाण्यायेण्याचा खर्च वाढत आहे. परिणामी पशुपालकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, या दृष्टीकोनातून बंद असलेला जनावरांचा बाजार तात्काळ सुरू करण्याची मागणी ही यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राम कांबळे, मोहोळ शहराध्यक्ष विनोद अष्टुळ, शहर उपाध्यक्ष किसन घोलप, शहर खजिनदार संतोष साबळे आदी उपस्थित होते.
Posted inDhurandhar News क्रीडा ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र मोहोळ राजकीय सोलापूर