मोहोळ, धुरंधर न्युज
युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांचे प्रतिपादन
कारखाना कामगार, सभासद शेतकरी व कारखान्यावर अवलंबून असणारे अन्य वर्ग वाहन मालक, चालक अशा सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम भीमा बचाव परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार नेटाने काम करतील, असा विश्वास व्यक्त करुन येणाऱ्या १३ तारखेला भिंतीवरील घड्याळासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करुन आपल्या सेवेची संधी द्या, असे आवाहन यावेळी बोलताना केले.
कोन्हेरी येथे भीमा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्तची कॉर्नर सभा जेष्ठ नेते नामदेव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कारखान्यातील विद्यमान सत्ताधाऱ्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया कोन्हेरी परिसरातील सभासद शेतकऱ्यांकडून सभेदरम्यान आल्या.
यावेळी या निवडणुकीतील उमेदवार देवांनंद गुंड-पाटील व कुमार गोडसे, मा. सरपंच भीमराव जरग, लोकनेते शुगरचे संचालक बाळासाहेब शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामचंद्र शेळके, समाधान शेळके, सरपंच गणेश पांढरे, अँड विलास शेळके, रवी गुंड, गोडसे तात्या, सतीश भोसले, रामदास चवरे, उद्योजक वैभव गुंड, बाबुराव शेळके, अँड महेश माळी, शंभूदाजी शेळके, आदींसह कोन्हेरी परिसरातील शेतकरी सभासद बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.