सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्यां “श्रीमंती सोलापूरची” पुरस्कारासाठी सामाजिक कार्याची दखल घेऊन मोहोळ तालुक्यातून पाच जणांची निवड करण्यात असून या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी मोहोळच्या शहाजीराव पाटील सभागृहात होणार आहे.
मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच व्यक्तीना “श्रीमंती सोलापूरची” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यामध्ये बोलवाडी प्रकल्पाचे प्रणेते जयप्रदा व योगेशकुमार भांगे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शितोळे, राष्ट्रीय खेळाडू केतकी शिंदे, संतोष नीळ आणि वृक्षमित्र सुदाम वसेकर यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी सोलापूर सोशल फाऊंडेशन संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, संभाजीराव गरड महाविद्यालयचे सचिव प्रतापसिंह गरड , निवृत्त कृषी अधिकारी प्रदीप काकडे हे उपस्थित असणार आहेत.